मुंबई : मौजे माहूलमधील अधिसूचित कांदळवन क्षेत्र व शासकीय जागेवर भराव करून कांदळवन क्षेत्र बाधीत केलेबाबत तसेच अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम २६ १ अ., फ. ह व ६३ अन्वये वनगुन्हा नोद करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासाकरिता गुन्हेप्रकरणी आवश्यक असलेली आरोपी महिला राणी मणी अर्जुन व शफिकउल्ला चौधरी यांना आज दि. १७.०२.२०२१ रोज़ी ताब्यात घेऊन अटक करून महानगर दंडाधिकारी कुर्ला ५२वे न्यायालयात हजर केले. आरोपी महिला राणी मणी अर्जुन यांना वैदयकीय कारणास्तव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे तर आरोपी शफिकउल्ला चौधरी यांना २ दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी राणी मणी अर्जुन यांनी भरावा करण्यात वापरलेले वाहन क्र. MH ४३ ४६৭११ ताव्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाईसाठी आर.टी.मगदुम सहा. वनसंरक्षक कांदळवन संरक्षण मुंबई, सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी मध्य मुंबई, वनपाल मोढवे व मन्सुरी, वनरक्षक नागरगोजे, झुगरे, पोले, जाधव, झाडबुके, कांबळे व गाडेकर स्टाफने दरील कारवाई नीनू सोमराज, उपवनसंरक्षक कांदळवन कक्ष मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे.