रत्नागिरी प्रतिनिधी : चिपळूण खेर्डी मोहल्ला येथील एक युवक कोणतीही प्रसिद्धीची अथवा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता छोटी मोठी सामाजिक कामे करीत असून गोरगरीब जनतेला तहसील कार्यालयातील कामे असो किंवा आरोग्य संदर्भातील काम असो तो नहमीच अशा कामामधे अग्रेसर आहे. जग हे काम करणाऱ्या आणि यशस्वी लोकांचाच मान सन्मान करीत असते. असचं एक नाव म्हणजे तौफिक चौगुले.
तौफिक चौगुले यांचा नुकताच वालावलकर रुग्णालय डेरवणच्या वतीने मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र देऊन जाहीर गौरव करण्यात आला.
तौफिक चौगुले यांनी रूग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापक . सुवर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब रूग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतानाच गरजू सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देखील योग्य ते उपचार मिळवून दिले आहेत.
या कामगिरीची दखल घेऊन जिल्ह्य़ातील नव्हे तर राज्यामध्ये नावाजलेल्या वालावलकर रूग्णालयाच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.