रत्नागिरी : कोरोनातील परिस्थितीत ग्रामीण भागामध्ये रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर मात करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून खनिकर्ममधील निधीतून ९ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. शुक्रवारी आणखी सात रुग्णवाहिका दाखल होणार असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.