राजीवडा ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते सेनेत

रत्नागिरी – सिंधुदुर्गचे भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत राजीवडा गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

लोकांच्या हितासाठी किरण सामंत अहो रात्र कष्ट करत असून त्याचा विचार करून राजीवडा गावाचे ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

यामध्ये वसीम चाऊस, ताऊसिफ गडकरी, निजाम सुवर्णदुर्ग, अशफान बुड्ये, तावक्कल कोतवडेकर, रेहमान म्हसकर, ताऊहिड दर्वेश, अबिद सुवर्दुर्गाकर, इम्रान मोहम्मद मुल्ला, सलमान फनसोपकर, रेहमान म्हसकर, इम्रान सोलकर, जुनेद फनसोपकर यांनी प्रवेश केला.

या प्रवेशासाठी सुदेश मयेकर यांनी मेहनत घेतली. यावेळी किरण सामंत, जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शिल्पा सुर्वे, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये, सोहेल मुकादम, स्मितल पावसकर, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*