JCI आणि युवा प्रभातकडून युवा दिन साजरा

दापोली : 12 जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय युवक दिन. जेसीआय दापोली व युवा प्रभात दापोली यांच्या संयुक्त विद्यमानं आझाद मैदान दापोली येथे युवक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी योग शिक्षक पतंजली योग समिती दापोलीचे पराग केळसकर यांनी दापोली मधील युवकांना व्यायामाचे महत्व व शारीरीक कसरती कशा कराव्या, स्वतःला फिट कसे ठेवावे, व्यसनांपासून कसे दूर राहावे याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले.

या कार्यक्रमात युवा प्रभातच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेतला व शारीरिक कसरती केल्या.

युवा प्रभात दापोली या सामाजिक उपक्रम करणार्या संस्थेला ११ वर्ष पुर्ण झाली या निमित्त केक कापुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी जेसीआय चे नूतन अध्यक्ष अतुल गोंदकर, माजी अध्यक्ष समीर कदम, ऋत्विक बापट आणि दिलीप चव्हाण उपस्थित होते तर युवा प्रभातच्या वतीने युवा प्रभातचे अध्यक्ष राहुल राठोड, श्रीराम जालगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*