गिम्हवणे येथे युवकाने केली आत्महत्या; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

दापोली :- दापोली तालुक्यातील गिम्हवणे गावातील दुबळे वाडी येथे रहाणा-या ओमकार भीमराव कलकुटकी वय सुमारे २३ वर्षे या युवकाने रहात्या घरात आज २२ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन चे सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर युवकास तातडीने शासकीय उपजिल्हा रूग्णालय दापोली येथे उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यानी मयत घोषित केले. या घटनेची नोंद सीआरपीसी १७४ नुसार दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली असून ,या घटनेचा पुढील तपास पोहेकाँ ७२७ अशोक गायकवाड करित आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*