आपण एखाद्या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी गेलो, की आपल्याला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता असते. मात्र 18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड नसल्यामुळे पालकांच्या गुंतवणुकीसाठी त्यांना नॉमिनी करायचं असेल किंवा मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर पॅनकार्डची गरज असते
मात्र आता NSDL दिलेल्या माहितीप्रमाणे -18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड काढता येईल – यासाठी मुलाच्या पालकांनी NSDL कडे अर्ज करणे आवश्यक आहे
कसे काढता येईल पॅन कार्ड ?
18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी पालकांचा पत्ता,आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आणि रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. या डॉक्युमेंट्ससोबतच मुलांच्या वयाचा पुरावा, पालकांचे फोटो आणि सह्याही अपलोड कराव्या – डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर 107 रुपये फी भरून फॉर्म सबमिट करा. त्यानंतर आपल्याला एक पावती क्रमांक मिळेल – तसेच एक व्हेरिफिकेशन ई-मेल येईल – त्यानंतर 15 दिवसांच्या आत आपल्याला पॅन कार्ड मिळेल – असे NSDL ने सांगितले.