दापोली : सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रियपणे सातत्याने कार्यरत असणाऱ्या जेसीआय दापोली या संस्थेच्या वतीने दापोली शहरातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या पण आजपर्यंत कधी ही प्रकाशझोता मध्ये न आलेल्या महिलांचा व्यवसायिक महिला रत्न म्हणून सन्मान करण्यात आला.
यामध्ये आकांक्षा जाधव, सुप्रिया संकपाळ, नूतन वैद्य, मुग्धा धारप, शामल जालगावकर, सौ. अनिता टांक, सौ. दीपिका करमरकर, सौ. अरुणा फुटाणकार, या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे स्वतःच कुटुंब सांभाळुन यशस्वी व्यवसायाची स्वप्नं पाहणाऱ्या या महिला म्हणजे आजच्या युवक पिढीला प्रेरणादायी आहेत. कुटुंबाकडून मिळालेली साथ आणि मदत हीच या यशाची गुरुकिल्ली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले, आणि अनेक महिलांनी व्यवसायाकडे वळावे असे आवाहन देखील यावेळी महिलांनी केले.
या कार्यक्रमासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, जेसी समीर कदम, जेसी आशिष अमृते, जेसी भूषण इस्वलकर, जेसी अभिषेक खटावकर, जेसी मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी. सिद्धेश शिगवण, जेसी रमेश जोशी, जेसी मयूर मंडलिक उपस्थित होते.