चिपळुण:- मतदार संघात विकास कामांना निधी मिळवून देण्याचा धडाका आणि त्यासाठी शासन दरबारी तेवढाच पाठपुरावा करणारे आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागातील गावे सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधला आहे.

शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकर्‍यांना विविध पिके घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकर्‍यांची ही समस्या ओळखून आ. निकम यांनी आपल्या चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात शासनाची मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल बावीस रस्त्यांची निवड करून निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव केले आहेत. या योजनेचा शेतकर्‍यांना फायदा होणार असून गेली कित्येक वर्षे रस्त्यासाठी टाहो फोडणार्‍या धनगरवाड्यांसह दुर्गम भागातील वाडी-वस्त्याही गावांना जोडल्या जाणार आहेत.