रत्नागिरी जिल्ह्य़ाची बिघडलेली प्रकृती सावरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे रत्नागिरीत येणार?

चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी काेराेनाबाबतची जिल्ह्याची गंभीर परिस्थिती मंत्री महोदयांसमोर मांडली

चिपळूण:- लॉकडाऊन व कडक लॉकडाऊन आदींची अंमलबजावणी करूनदेखील रत्नागिरी जिल्ह्यात करोना आटोक्यात येत नाही, जिल्ह्याची स्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वाढते मृत्यू व प्रशासनाचा एकूण कारभार याची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी घेतली असून या दोघाही मंत्र्यांनी येत्या सोमवारी रत्नागिरीत येणार असल्याचं कळत आहे . चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मंत्रालयात या दोन्ही मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची इत्यंभूत माहिती दिली. आ. शेखर निकम यांनी सडेतोडपणे सर्व बाबी स्पष्ट केल्यानंतर जिल्ह्याची एकूण परिस्थिती या दोन्हीही ज्येष्ठ मंत्र्यांच्या ध्यानी आली आणि त्यांनी तातडीने येत्या सोमवारी दि. २१ जून रोजी रत्नागिरीत येण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. रोजची जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या व वाढते मृत्यू यामुळे जिल्ह्याची प्रकृती चिंताजनक बनल्याचे मानली जाते. रत्नागिरी जिल्हा पॉझिटीव्हीटी दरात राज्यात शेवटून २ रा आहे. रत्नागिरीचा पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असले तरी त्याला यश आलेले नाही. प्रशासनासमोरील अनेक अडचणी आहेत मुळात तज्ज्ञ अपुरे वैद्यकीय अधिकारी व अपुरी आरोग्यव्यवस्था अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी प्रशासनासमोर आहेत. जिल्ह्याची एवढी परिस्थिती असूनही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, दरवेळी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सतत बैठका होत असतात मात्र त्यातून काही निष्पन्न होत नाही त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला वाली राहिलेले नाही चिपळूणचे जागृत व तडफदार आमदार शेखर निकम यांनी या प्रश्नी आता जातीने लक्ष घातले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*