रायगड पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला!

रायगड : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालक मंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

रायगडचं पालकमंत्रिपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं.

तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं.

मात्र या दोनही ठिकाणी पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे नेते इच्छूक होते.

नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे इच्छूक होते. मात्र पालकमंत्रिपद न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.

भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा होती.

मात्र त्यांना पालकमंत्रिपद मिळालं नाही, त्यांच्या ऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळालं तर नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना मिळालं यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती.

त्यानंतर महायुती सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली, अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे.

पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे.

पहिले अडीच वर्षे आदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री पदी राहण्याची शक्यता आहे.

तर दुसऱ्या अडीच वर्षांत पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता अडीच – अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे.

यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही रायगडचं पालकमंत्रिपद मिळू शकतं.

पहिले अडीच वर्ष आदिती तटकरे तर दुसरे अडीच वर्ष भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.

त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*