दापोली:- गांधी सप्ताह औचित्य साधून एल एस पी मंडळ टाळसुरे आष्टा ची वाडी यांनी पाणी आडवा पाणी जिरवा नदीला बंधारा घालण्याचा उपक्रम आज दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी संपन्न झाला पाणी आडवा पाणी जिरवा असा स्तुत्य कार्यक्रम मंडळाचे कार्यकर्ते सभासद केली पंचवीस ते तीस वर्षे सातत्याने करत आहेत गावचे प्रथम नागरिक प्रभाकरजी लाले यांनी उपस्थित राहून उपस्थित असलेल्या मंडळाच्या सर्व सभासदांना प्रोत्साहन दिले. मंडळाचे अध्यक्ष मोहन सणस सचिव संदीप सकपाळ सल्लागार सिताराम सणस सदस्य सुरेश सकपाळ दीपक पांदे दत्तात्रेय लाले शाम सकपाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.