दापोली- दापोली तालुक्यातील डाॅ. वि. रा. घोले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी व वैष्णवांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वारकरी दिंडीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयाचे प्राचार्य अरुण सिदनाईक यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मारुती चव्हाण, सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

वारकरी दिंडीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी वैष्णवांची वेशभूषा परिधान केली होती. आषाढी एकादशीनिमित्त या विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या अभंगांचे सामुहिक गायन केले. याशिवाय झिम्मा-फुगडी, दिंडी, भजन व रिंगणाचे कार्यक्रम सादर केले.

वैष्णवांच्या वारीचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सपना सावंत, सविता महाडीक, एस. एस. पोवार यांनी केले होते. विठुरायाच्या सामुहिक आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी एस.एस. कदम यांनी सर्वांचे आभार मानले.