महिलेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला बेड्या

रत्नागिरी शहर पोलिसांची कामगिरी; पोलीस कोठडीत रवानगी

रत्नागिरी : 21 मे 2020 रोजी फेसबुकवर एका महिलेची अश्लिल चित्रफित व्हायरल करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने बुधवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्रिलोकसिंग हयातसिंग कोरंगा (वय 36, मूळ रा. उत्तराखंड, सध्या राहणार बाणेर रोड बालेवाडी, पुणे) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक गणेश सावंत यांनी तक्रार दिली होती. सावंत यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी संशयित आरोपीला पुण्यातून अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*