दापोली आझाद मैदानात मानवी साखळी-रांगोळी

मतदान जाणीव जागृतीसाठी दापोली प्रशासन सज्ज

दापोली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच, देशभरात सर्वत्र निवडणूक यंत्रणा सक्रीय झाली आहे.

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.अजीत थोरबले यांच्या संकल्पनेने दापोली आझाद मैदान येथे जिल्ह्यात पहिली मानवी साखळीची रांगोळी करुन दापोली मतदारसंघातील मतदारांना मतदानाची जाणीव जागृती करण्यात आली.

प्रारंभी प्राथमिक शिक्षकांचे पथकाने पोवाडा, जाणीव जागृती गीते सादर केली. त्यानंतर वराडकर काॅलेजची युवती सानिया पवार हिने परखड आवाजात पोवाडा सादर केला.

तर कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु संजय भावे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी सुमारे दोन हजार विद्यार्थी आणि तालुक्यातील असंख्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी राष्ट्रध्वजासह मानवी साखळी करीत मतदानाची प्रतिज्ञा केली.

नगरपंचायत मुख्याधिकारी IAS अधिकारी डाॅ.जस्मीन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डाॅ.अजीत थोरबले, दापोली तहसिलदार अर्चना बोंबे, मतदान प्रचार आणि प्रसार प्रमुख नोडल ऑफिसर  अण्णासाहेब बळवंतराव, सहाय्यक बळीराम राठोड, नायब तहसिलदार माधूरी शिगवण, शरदकुमार आडमुठे, रणजीत शिराळकर आदिंच्या हस्ते घोषणा लिहिलेले फुगे आकाशात सोडण्यात आले.

तिरंगी फुगे सोबत मतदान विषयक घोषवाक्ये आकाशात सोडल्यानंतर अगदी नयनरम्य प्रसंग दिसत होता.

तसेच तालुक्यातील कला शिक्षकांनी विविध पोस्टर (चित्रतक्ते) तसेच उत्कृष्ठ रांगोळ्या तयार केल्या होत्या.

यावेळी उत्कृष्ठ नियोजन आणि कार्यवाहीसाठी तहसिलदार अर्चना बोंबे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं संजय मेहता यांनी सुत्रसंचालन केलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*