रत्नागिरी दि. 12: राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 13 मे 2021 रोजी सकाळी 09.00 वाजता जुहू विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदूर्ग जिल्हा यांच्यासमवेत रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 10.30 वाजता महिला रुग्णालय, रत्नागिरी येथे दुसऱ्या टप्प्यामधील इमारतीची पहाणी. (स्धळ :महिला रुग्णालय,रत्नागिरी) सकाळी 11.00 वाजता ऑक्सीजन प्लँटची पाहणी. (स्धळ :महिला रुग्णालय,रत्नागिरी). सकाळी 11.15 वाजता रत्नागिरी जिल्हयामध्ये कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खनिकर्म योजनेच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांगन, रत्नागिरी). सकाळी 11.30 वाजता रत्नागिरी जिल्हयातील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना,कडक निर्बंध व लसीकरणाबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 12.30 वाजता कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मेडीकल ऑक्सीजन पुरवठा, वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडीकल स्टॉफ (आरोग्य आस्थापना) आढावा तसेच माझी रत्नागिरी माझी जबाबदारी आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 01.00 वाजता रत्नागिरी जिल्हयातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 02.00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 02.30 ते 03.45 वाजता राखीव.
दुपारी 03.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून रत्नागिरी विमानतळ कडे प्रयाण. दुपारी 04.00 वाजता रत्नागिरी विमानतळ, ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व हॅलिकॉप्टरने जुहू विमानतळ, मुंबईकडे प्रयाण.