रत्नागिरी दि.10:- राज्याचे परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता वांद्रे निवासस्थान येथून शासकीय मोटारीने दापोली जि. रत्नागिरीकडे प्रयाण. रात्रौ 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह दापोली येथे आगमन व मुक्काम.शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 रोजी शासकीय विश्रामगृह दापोली येथे राखीव.
शनिवार 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह दापोली येथून शासकीय मोटारीने शिरगाव ता. मंडणगडकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता शिरगाव ता. मंडणगड रत्नागिरी येथे महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या स्वागतासाठी उपस्थिती (स्थळ: शिरगाव हेलिपॅड, ता. मंडणगड जि. रत्नागिरी). सकाळी 10.35 वाजता शिरगाव हेलिपॅड येथून शासकीय मोटारीने आंबडवे ता. मंडणगड कडे प्रयाण. दुपारी 11.15 ते 12.15 वाजता आंबडवे ता. मंडणगड येथे आगमन व महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या समवेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगाव येथे आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: मु.पो. आंबडवे ता. मंडणगड). दुपारी 12.20 ते 2.15 वाजता राखीव. (स्थळ: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, आंबडवे ता. मंडणगड). दुपारी 2.15 वाजता आंबडवे ता. मंडणगड येथून शासकीय मोटारीने शिरगाव कडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता शिरगाव हेलिपॅड ता. मंडणगड येथे आगमन. दुपारी 3.05 शिरगाव ता. मंडणगड रत्नागिरी येथून महामहिम राष्ट्रपती महोदय यांचे प्रयाण. (स्थळ: शिरगाव हेलिपॅड, ता. मंडणगड, रत्नागिरी). दुपारी 3.30 वाजता शिरगाव ता. मंडणगड येथून शासकीय मोटारीने मुंबईकडे प्रयाण.