पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रम

रत्नागिरी दि.19: राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 21 जुन 2021 रोजी पहाटे 05.15 वाजता दादर रेल्वे स्टेशन, मुंबई येथे आगमन व 01151 जनशताब्दी एक्सप्रेसने (स्पेशल) रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण, आगमन व राखीव. दुपारी 03.30 वाजता कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर मा. उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सांयकाळी उपरोक्त बैठक संपन्न झाल्यानंतर मा. उपमुख्यमंत्री महोदयांसोबत रत्नागिरी विमानतळकडे प्रयाण.सायंकाळी मा. उपमुख्यमंत्री महोदयांसोबत रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*