
रत्नागिरी : नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेत वेदा विजय पाडावे हिने ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक मिळवला.
रा. भा. शिर्के प्रशालेत शिकणाऱ्या वेदाने आपल्या चित्रातून स्वच्छ रत्नागिरीचा संदेश प्रभावीपणे मांडला.
या यशाबद्दल वेदाचा गौरव उद्या २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता नगरपरिषद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात स्वच्छता चॅम्पियन आणि पर्यावरण दूतांचाही सन्मान केला जाईल.
वेदाच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply