लसीकरणाची गती जुलै, ऑगस्टमध्ये वाढवणार- अमित शहा

भारत सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्यासाठी नियोजन केले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आजपासून देशात लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात, १८ वर्षांवरील सर्व लोकांना विनामूल्य लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथून याचा शुभारंभ केला. अमित शहा तीन करोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन केलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्रात लसीकरणाचा आढावा घेतला. अमित शहा म्हणाले की, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मोठा निर्णय आहे. आज योग दिनानिमित्त याची सुरुवात देशभर सुरू आहे. आता आम्ही प्रत्येकाला लस देण्याच्या उद्दीष्ट्याकडे झपाट्याने पोहोचू. शाह यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सर्व लोकांनी लसीकरण केलेच पाहिजे तसेच करोनावर मात करण्यासाठी दुसरी लस देखील वेळेवर घ्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*