कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारताला कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय असल्याचे अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ डाॅ. अँथनी फाउची यांनी म्हटले  आहे. 

कोरोना नियंत्रणात न आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नेतृत्वावर कडाडून टीका होताना दिसत आहे. भारत मोठा लस उत्पादक देश असताना देखील लसीकरणावर ज्याप्रमाणात भर द्यायला पाहिजे होता, तेवढा भर दिला गेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता अमेरिकन सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डाॅ. अँथनी फाउची यांनी भारताला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.