देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट पसरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक जलद आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण सर्वसामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनाही झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. तर आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जावडेकर यांनी ट्विट करुन सांगितले आहे. तसेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची चाचणी करण्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.