नवी दिल्ली : देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे. (Home Minister Amit Shah tested Corona Positive)
‘कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी’ असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
कोरोना विरूद्धची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढणं आवश्यक आहे. कोरोना काहीही पाहत नाही. प्रत्येक माणसाला तो होऊ शकतो. खबरदारीच्या उपाययोजना करणं खूप गरजेचं बनलं आहे. प्रत्येकानं आपली काळजी घेणं आवश्यक आहे.