रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. भारताने याबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रात रशियाविरुद्ध निषेध प्रस्ताव सादर केला असता, भारताने मतदान केले नाही. का नंतर अमेरिकेकडून भारता बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच भारतावर निर्बंध घालावेत का? यावर चर्चा सुरू असल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान भारताने आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी भारतावर अमेरिका दबाव आणत आहे.