केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवेसनेच्या काही नेत्यांवर आरोप केला आहे. शक्रुवारी राणेंच्या मुबंईतल्या बंगल्यातील कामाची पाहणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची टीम गेली होती. बंगल्यात नियमांचे उल्लंघन करुन काम करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. यावरुन नारायण राणेंनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. तर शिवसेनेच्या काही नेत्यांवर आरोप करण्यात आले आहेत. कोणाच्या घराची चौकशी केली नाही. जर कोणाला साधा फोन जरी केला असेल तर किंमत मोजायला तयार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. नारायण राणेंच्या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं असून आरोप फेटाळले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या जुहू येथील घरावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर स्पष्टिकरण दिलं आहे. तसेच एका प्रकरणाचा उल्लेख करुन कोकणातील शिवसेना नेत्यांनी घराची चौकशी करण्यास एका व्यक्तीला सांगितले होते. तसेच त्यामध्ये चौकशी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर या नेत्यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे दाखवले होते. यामध्ये शिवसेना नेते उदय सामंत यांच्यावरसुद्धा नारायण राणेंनी आरोप केला होता. परंतु आपला यामध्ये संबंध नाही. जर कोणाला साधा फोन केला असेल तर मी किंमत मोजायला तयार आहे असे उदय सामंत म्हणाले.

उदय सामंतांचे राणेंना प्रत्युत्तर

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. मी कोणाच्या घराची चौकशी लावली नाही. परंतु जर मी साधा कोणाला फोन जरी केला असेल तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. कोणाचे घर पाडण्याचे पाप मी करत नाही. असले राजकारण करत नाही आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देतो. कोणाचे घर किती मोठे आणि कोणाच्या घराचे मजले किती याचे मला काहीही घेणे-देणे नाही. त्यामुळे मी कोणाच्या घराची चौकशी लावली नसून कोणाला पाठीशी घालणार नाही असा पलटवार उदय सामंत यांनी केला आहे.

उगाच प्रत्युत्तर देऊन कोणाला मोठं करणार नाही

शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीद्वारे कारवाई होत आहे. परंतु कोणत्या नेत्यावर ईडीची कारवाई होणार आणि ईडीची धाड कधी पडणार ? हे जर केंद्रीय मंत्र्यांना माहिती असेल तर ईडीच्या कामाबाबत काय बोलणार असा उदय सामंत म्हणाले. कोणी आरोप केले तर त्यांना प्रत्युत्तर देऊन मोठ करत बसणार नाही असा टोला देखील उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला आहे.