नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ : उदय सामंत

रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि इतर घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांचा कार्यकर्ता मेळावा हजारोच्या उपस्थित रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अनेकदा आपण आपसापसात भांडत बसतो. मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर आपसातील वाद मिटवले पाहिजेत.

त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी रत्नागिरी महायुतीची जयंत तयारी आपण सर्वांनी मिळून करूया, असे उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात काढले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवाला तर कार्यकर्तेही आपोआप समन्वय ठेवतील, असा सल्ला उदय सामंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

आज जमलेल्या कार्यकर्त्यांनी महायुतीची जिल्ह्यातील ताकद दाखवून दिली. हीच ताकद येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायत पर्यत दाखवली तर रत्नागिरी जिल्ह्यात महायुती शिवाय राहणार नाही, असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

महायुतीचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही यांची जबाबदारी माझी राहिल असा शब्द यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिला.

सगळ्यांनी एक संघपणे राहून रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून महायुतीचा उमेदवार निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना केले.

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी- रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते -समन्वयक सदानंद चव्हाण, माजी आमदार भाजपाचे समन्वयक प्रमोद जठार, आमदार राष्ट्रवादीचे समन्वयक शेखर निकम, आमदार योगेश कदम, किरण उर्फ भैय्या सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, पुजा निकम, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, शिवसेना महिलाप्रमुख शिल्पा सुर्वे, जयंद्रत खताते, सिकंदर जसनाईक, जाकीर शेकासन, बाप्पा सावंत, सुरेखा थेराडे, उल्का विश्वासराव, सर्व तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*