रत्नागिरी दि.06: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार ०७ मे २०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजता आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कोविडसाठी खर्च करण्याबाबत आढावा बैठक. सकाळी ०९.३० वाजता रत्नागिरी शहर नळ पाणी पुरवठा योजनेबाबत आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी १०.०० वाजता रत्नागिरी येथे ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषद (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी ११.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने राजापूर, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी ०१.०० वाजता राजापूर, जि. रत्नागिरी येथे आगमन व ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : तहसिलदार कार्यालय, राजापूर, जि. रत्नागिरी). दुपारी ०१.३० वाजता पत्रकार परिषद. (स्थळ : तहसिलदार कार्यालय, राजापूर, जि. रत्नागिरी). दुपारी ०२.०० वाजता राजापूर येथून मोटारीने कणकवली कडे प्रयाण.