सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीच्या दोन खेळाडूंची पिंच्याक सिलॅट राज्य स्पर्धेसाठी निवड


दापोली: – शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी खेड येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय पिंच्याक सिलॅट अजिंक्यपद स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीचे दोन खेळाडू यांनी सबज्युनिअर मुलांच्या वजनी गटात ओम नितीन विचारे याने सुवर्ण पदक तर साई प्रसाद ऊत्पल वराडकर रौप्य पदक संपादन केले. तर या दोन्ही खेळाडूंची मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दोन्ही खेळाडूंचे सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणीचे चेअरमन श्री सुजय मेहता व प्राचार्या सौ. रितु मेहता आणि स्कूलचे क्रिडा शिक्षक प्रा. सुनिल चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करुन संपूर्ण शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*