कोयनाधरण व पाटण तालुक्यात भूकंपाचे सलग दोन धक्के

कोयनानगर – कोयना धरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3 वाजून 21 मिनिटांनी 3 रिश्टर सेल व त्यानंतर लगेच 3 वाजून 33 मिनिटांनी 2.8 रिश्टर सेल भूकपाचा धक्का जाणवला, असल्याची माहिती उविभागीय अभियंता, उपकरण उपविभाग कोयनानगर यांनी दिली.

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून किती अंतरावर आहे, यांची माहिती भूकंप मापन केंद्र देणार आहे.पाटण परिसरात दोन्ही धक्के बसले आहेत. दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांच्यात चर्चेचा विषय बनला. त्यामध्ये सलग दोन धक्के 12 मिनिटांच्या फरकांनी बसले आहेत.

या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी पाटण तालुक्यात कोणतीही हानी झाली नसल्याचे दिसून आले आहे. अधिक माहीती धरण व्यवस्थापन व पाटणचे महसूल विभाग घेत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावच्या पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*