नारगोलीतील दोन जुळ्या बंधूंची शिक्षण क्षेत्रात उज्वल भरारी

दापोली : तालुक्यातील नारगोली गावचे रहिवाशी प्राथमिक शिक्षक राजेंद्र भिकू जाधव यांचे जुळे सुपुत्र – जय आणि विश्व जाधव या बंधूनी MHT-CET परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. 

विशेष म्हणजे या दोघांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेतून तर माध्यमिक शिक्षणही मराठी माध्यमातून घेऊन उच्च माध्यमिक शिक्षण हे इंग्रजी माध्यमातूनच घेत हे यशोशिखर गाठले. PCB घेत जयने 97.54 टक्के तर PCM घेत विश्वने 92.73 टक्के गुण प्राप्त केले.

शिक्षण क्षेत्रात उज्वल भरारी घेतलेल्या जाधव बंधू सोबतच त्यांचे आईवडील, गुरुजन यांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*