भरणे पुलाच्या कठड्यास कंटेनरची धडक, उतारामुळे नियंत्रण सुटले


खेड : महामार्गावरील भरणे उड्डाणपूलाच्या पुढे उतारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर जगबुडी पुलाच्या कठड्यावर धडकला आहे. कंटेनर मधील सहा लोखंडी मोठे पाईप पुलावरुन नदीच्या पात्रात कोसळले.

गोवर्धन योगी (२७, रा. अजमेर) हा कंटेनर (क्र. जीजे १२ बीएक्स ६६६७) घेऊन गुजरातमधून गोव्याकडे निघाला होता. मोठे आठ पाईप कंटेनर मध्ये होते.

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे उड्डाण पूलाच्या तीव्र उताराच्या रस्त्यानंतरच्या वळणावर कंटेनर आला. तेव्हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर जगबुडी पुलाच्या कठड्यावर धडकला.

या धडकेत कंटेनर चे बेल्ट तुटले आणि सहा पाईप जगबुडी पात्रता कोसळले. तर दोन पुलाच्या रस्त्यावर पडले होते. तेव्हा जोरदारपणे आवाज झाला.

अपघातानंतर पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर चालक कंटेनर मध्ये जखमी अवस्थेत पडून होता. मदतकार्य करणाऱ्यांनी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने पुलावरील दोन पाईप आणि कंटेनर बाजूला केले. तर वाहतूक सुरळीत करुन दिली.

Advetisement

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*