दापोलीमध्ये ट्रिपल मर्डर झाल्याचे उघड

दापोली : तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे काल तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हा घात आहे की अपघात असा सवाल ‘माय कोकण’नं विचारला होता.

पोलिसांनी या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करून मृत्यूचं खरं कारण शोधलं आहे. या तिन्ही महिलांचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे स्पष्ट झाला आहे.

पोलीसांच्या तपासामध्ये या घरांमधून 1,62,150 रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. चोरीच्या उद्देशानंच खून केला गेला असावा, असं प्राथमिक तपासात पुढे आलं आहे.

या घटनेमध्ये सत्यवती पाटणे -75, पार्वती पाटणे- 90 व इंदुबाई पाटणे 85 या तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.

आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*