पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दापोली मतदार संघात वृक्षारोपण मोहिम

खेड ” वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असा नारा देत दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार संघात वृक्ष लागवड मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्या दिवसापासून पुढील एक महिना मतदार संघात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षात कोकणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे. हा समतोल राखण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा या भावनेने आमदार योगेश कदम यांनी वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत शासकिय यंत्रणेसह शिवसेना आणि युवा सैनिक सहभागी होणार आहेत. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तसेच जास्त जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कदम यांनी केले आहे.
राष्ट्रिय महामार्ग, राज्य महामार्ग, कोस्टल महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्गाच्या दुतर्फा जास्तीत जास्त लागवड करण्यात येणार आहे. शिवाय शासकिय जागा, वनविभागाच्या जागा, तसेच शेतकऱ्यांच्या खासगी जागेतही नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला आहे, वृक्षारोपण मोहिम यशस्वी करण्यासाठी मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क करून त्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशिर असणाऱ्या फल बागायती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवाय अन्य शासकिय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा आपला मानस असल्याने आमदार योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*