सरपंच रविंद्र घाग यांनी केला शुभारंभ

दापोली तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्राम पंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगा अंतर्गत कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

या अंतर्गत नारीशक्ती सोशल फाउंडेशन गोकुळ शिरगाव आणि ग्राम पंचायत अडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील 35 महिलांसाठी शिवण क्लास  सुरू करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचे उदघाटन अडखळ सरपंच रवींद्र घाग यांचे हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी रसिका आंबेकर, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जहुर कोंडविलकर, ग्राभपंचायत सदस्य सचिन कदम, अंजली मळेकर, मनाली चौधरी, दर्शना कदम, रमीझा काझी, दापोली तालुका संपर्क प्रतिनिधी निकिता बालगुडे, मास्टर ट्रेनर सना काझी, आसमा वाकणकर, दिनेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

गावागावात कौशल्य विकास योजनेतून अधिकाधिक रोजगार  उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश यामागे असून यातूनच ग्रामीण भागात आर्थिक क्रांती होईल अशी आशा व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी या योजनेचा जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

अडखळ ग्रामपंचायत अंतर्गत 35 महिलांनी शिवण क्लास मध्ये भाग घेतला असून सदरचे प्रशिक्षण एक महिन्याचे असणार असून यासाठी मास्टर ट्रेनर सना काझी हर्णे या प्रशिक्षक असणार आहेत.