रत्नागिरी- सावधान! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. आता खबरदारी नाही घेतली तर भविष्यात परिस्थिती अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 203 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दिवसभरामध्ये 1713 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 203 लोकं पॉझिटिव्ह आढळली आहेत. सुदैवानं गेल्या 24 तासात एकही रुग्ण उपचारा दरम्यान दगावलेला नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या 722 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक गोष्ट समाधानाची आहे की, गेल्या चोवीस तासांमध्ये 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना मुक्तीचे प्रमाण 96 टक्क्याच्या पुढे आहे. त्यामुळे घाबरून न जाता सरकारला आणि प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन प्रशासनामार्फत केलं जात आहे.