रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज गुरूवारी (दि. २४) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत १०रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्यूची नोंद नाही, तर २८ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ३
▪️गुहागर ३
▪️चिपळूण २
▪️लांजा १
▪️संगमेश्वर १
एकूण १०