दापोली : दापोली- मंडणगड मार्गावरील खेर्डी ग्रामपंचायतीनजिक दापोलीहून मंडणगड कडे निघालेल्या दुचाकीची धडक गाईला बसल्याने या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार
आज सकाळी ११.०० सुमारास खेर्डी ग्रामपंचायती जवळ मोटरसायकलची गाईला धडक बसल्याने दुचाकी वरुन प्रवास करणारे सुमित जाडे (वय – २३), संध्या जाडे (वय – ४५) व सुश्मिता जाडे (वय २०) हे तिघेजण जखमी झाले आहेत.

या अपघातात माय लेकींच्या डोक्याला इजा झाली आहे तर सुमितचा पाय फ्रँक्चर झाला आहे.

या तिघांनाही दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या सर्वांना मानाचा गणपती व इतर रुग्णवाहिकेमधुन दापोली येथे आणण्यात आलं.

जखमींना मनसेचे सचिन गायकवाड, साई देसाई, रोहित शिंदे, भाजपाचे उपजिल्हा अध्यक्ष केदार साठे, खेर्डी तंटामुक्त अध्यक्ष अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कदम, अंगणवाडी सेविका अपर्णा जाधव, तुकाराम जोशी यांनी मदत केली.

दापोली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश कुऱ्हाडे, डॉ. मिलन सुतार, दिपिका बनसोडे, निकिता घुगरे, मयुर पराळे, सनी वाघेला इ. कर्मचारी यांनी जखमींवर उपचार केले.