चोरांची डेरिंग वाढली, थेट पोलिसाच्या घरात केली चोरी

वेरळमधील चोरीची जोरदार चर्चा.

खेड – गेल्या आठवड्यात वेरळ गावातील समर्थ कृपा विश्व संकुलातील दोन रो- हाऊस आणि पाच प्लॅट चोरट्यांनी फोडले होते. या चोरीचा तपास पोलीस करीत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी वेरळ रेल्वे स्टेशन समोरील भागातील पोलिसाचा बंगला फोडला आहे. ही चोरी खेड परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

त्याशिवाय शेजारील इमारतीमधील प्लॅटही फोडून चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. खेड पोलिस ठाण्यात कर्तव्यात असणारे मोरे यांची काही महिन्यांपूर्वी दापोली पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

त्यामुळे मोरे यांनी बंगला रिकामा ठेऊन परिवारासह दापोलीत वास्तव सुरु केले आहे. हा त्यांचा बंगला रिकामा होता.

तोच बंगला चोरट्यांनी फोडला आहे. या बंगल्याशेजारील इमारतीमधील एक बंद प्लॅटही चोरट्यांनी फोडला. या दोन्ही चोरीत किती रक्कमेचा माल चोरीला गेला आहे, हे मात्र समजू शकलेले नाही.

खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही चोरीचा पंचनामा केला आहे. दोघेही घरमालक बाहेरगावी असल्याने नेमके किती रकमेची चोरी झाली आहे, हे समजू उशिरा पर्यंत समजू शकलेले नव्हते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*