सुरुवात त्यांनी केलीय, पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही -केंद्रीय मंत्री नारायण राणे

माझ्या मुंबईच्या घरावर कारवाई असेल किंवा अन्य त्रास देण्याचे प्रकार असतील. सुरुवात त्यांनी केलीय. पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.तसेच नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर हे देखील लवकरच कळेल असे ते म्हणाले. ओसरगाव येथील महिला भवनमध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रकरणं उकरून काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी योग्य त्या परवानग्या मिळवूनच मालवण आणि मुंबईतील घर बांधलं आहे. मुंबईतील घरामध्ये खिडकीची कमान छोटी असावी की मोठी असावी असे किरकोळ आक्षेप मुंबई महानगरपालिकेने घेतले आहेत. मालवण येथील घराबाबतही मला कुठलीही नोटीस आलेली नाही. तरीही काही माध्यमे चुकीची माहिती देऊन माझी बदनामी करत आहेत. अशी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही श्री.राणे यांनी दिला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*