देशात लॉकडाऊन लागणार नाही,
पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत

नवी दिल्ली : कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते.
कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “होम आयसोलेशनमध्ये जास्तीत जास्त उपचार होणं शक्य आहे. त्यामुळे होम आयसोलेशन संबंधी नियमांचे पालन करावं. ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही.”
आवश्यक असलेल्या औषधांच्या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे, सर्व राज्यांकडे लसीचे डोस उपलब्ध आहेत असंही पंतप्रधान म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*