गोवा राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिल्याने विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.कदाचित गोव्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असं काँग्रेसला वाटत आहे. त्यावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही.आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल. गोव्याची जनता योग्य तो कौल देईल व गोव्यातही महाराष्ट्रासारखे एक सक्षम सरकार येईल याचा आम्हाला विश्वास वाटतो, असा दावाही राऊत यांनी केला आहे.