महाराष्ट्रात वाईनचा महापूर येणार 1000 चौ.फु.च्या दुकानात करता येणार विक्री

मुंबई :- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज वाईन बाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आणि एक हजार चौरस फुटाच्या दुकानात आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.१००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*