चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून बचावासाठी लस तयार करण्यापूर्वी मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे, असे सांगितले होते. सध्या जगभरात सर्वांनाच मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, आता इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्रायलमध्ये प्रशासनाने लोकांना मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.