केंद्रात मंत्रीपदासाठी नारायणे राणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता

पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. राणे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. ते सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली आहे. सर्व मंत्रालयांचा आढावा घेऊन मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय यामध्ये झाल्याचे समजते.

नव्या विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आता मंत्र्यांची संख्या ५४ आहे. ती ७९ पर्यंत वाढू शकते. नव्या विस्तारामध्ये राज्यातील काही नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*