दिल्ली – लोकसभेच्या हिवाळी हंगामाला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले.

त्यानंतर आता राज्यसभेत देखील तीन कृषी कायदे बील मंजूर करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये कृषी कायदे बील रद्द करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

विरोधी पक्षांकडून कृषी कायदा बिलाबाबत एकच गदारोळ पहायला मिळाला होता. परंतु विरोधी पक्षांकडून हे बील रद्द करण्याची मागणी धरू लागली.

त्याप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक रद्द करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी म्हणजेच मंजुरी मिळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण राष्ट्रपतींनी यावर निर्णय घेतल्यास हे तीन कृषी कायदे बील रद्द होऊ शकतात.