रत्नागिरी : जिल्ह्यात रेमडेसिवीरची सुमारे शंभर इंजेक्शन शिल्लक असून, दोन दिवस पुरतील एवढाच त्याचा साठा आहे. वाढत्या रुग्णांसाठी बेड वाढवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना उपचारासाठी आरोग्य यंत्रणा मैदानात उतरली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.