दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनला वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. सध्या रशिया विरूद्ध युक्रेन युद्ध सुरू आहे.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करित आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आकाश कोबनाक आज सकाळी बसने रूमानिया सरहद्दीकडे निघाले आहेत. एकूण बावीस विद्यार्थी घेऊन राजदूतांसहीत बस निघाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी सुमारे तीन ते साडेतीन तासात आकाश यांची बस रूमानियाच्या सरहद्दीपलीकडे पोहचेल आणि नंतर पुढे त्यांचा विमान प्रवास सुरू होईल. आकाश टर्नोपिल येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे या ठिकाणाहून आज सकाळी त्याचा भारताकडे येण्यासाठी पहिल्या अकरा तासाच्या टप्याचा प्रवास सुरू झाला.