▪️ देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा करणार आहेत.

▪️ सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत.

▪️ आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्याने त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे.

▪️ सध्या देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे.

▪️ देशातील काही राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यांचा पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढत आहे.

▪️ महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. येथील पॉझिटिव्हिटी रेटही दिवसागणिक वाढतच आहे.

▪️ देशातील 19 राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. तर चार राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या पाच हजार इतकी झाली आहे.