राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळत आहे.
त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे.
चीनसारख्या देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ग्लोबल रुग्णालयाचे संसर्गजजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर हरीश चाफळे यांनी राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘जूनमध्ये राज्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. पण ती लाट सौम्य असेल, असे हरीश चाफळे म्हणाले.’
पुढील तीन महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते. पण लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल.
कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अन्यथा चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल.