मनसे सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले,राज ठाकरे सुरक्षित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते. राज ठाकरे व इतर नेते सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गोरेगाव येथे मनसे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठ कोसळले तेव्हा राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.

आज मुंबईत चांदिवली आणि गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांदिवली येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे हे गोरेगाव पूर्व येथे दाखल झाले. यावेळी स्थानिक पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी होती. राज ठाकरे आणि मनसेचे इतर पदाधिकारी असताना व्यासपीठावर असताना अचानक मंच कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. राज ठाकरे व इतर पदाधिकारी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*